Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

'सेवास्पर्श फाऊंडेशन'ची सामाजिक बांधिलकी ; तरुणांकडून उत्स्फूर्त रक्तदान'

'सेवास्पर्श फाऊंडेशन'ची सामाजिक बांधिलकी ; तरुणांकडून उत्स्फूर्त रक्तदान'

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पार्श्वभूमीवर सेवाकार्य


सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रातील रक्ताचा आणि रक्तपिंडांचा (Platelets) तुटवडा लक्षात घेता, 'सेवास्पर्श फाऊंडेशन'ने सामाजिक बांधिलकी जपत तातडीने रक्तदान मोहीम राबवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत आवाहनाला प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या माध्यमातून तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.


जिल्हा रुग्णालयाचे होते आवाहन

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील रक्तपेढीत सध्या रक्ताचा साठा कमी झाला असून, वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांसाठी ऐनवेळी रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी 'सेवास्पर्श फाऊंडेशन'चे अध्यक्ष मा. परमानंद वेंगुर्लेकर यांना पत्र लिहून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आणि परिचयातील सामाजिक कार्यकर्त्यांना स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे नम्र आवाहन केले होते.

फाऊंडेशनच्या सदस्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

पत्राची गांभीर्याने दखल घेत, सेवास्पर्श फाऊंडेशनने जराही वेळ न दवडता आज रक्तदान मोहीम हाती घेतली. यावेळी सेवास्पर्श फाऊंडेशनचे सदस्य ॲड. प्रदीप मिठाबावकर, गणेश वाईरकर, शेखर मसुरकर, सागर चव्हाण, बाळकृष्ण वालावलकर, महेश चव्हाण, गुरुप्रसाद राऊळ, विनय मठकर, किरण वाईरकर, दिपक राऊळ, उमेश पाटील, बीजी गावडे, स्वप्निल वेंगुर्लेकर, अभिषेक नेवाळकर, साईराज पावसकर, दिनेश कांबळी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या रक्त केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. फाऊंडेशनच्या या तातडीच्या पुढाकारामुळे जिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मोठी मदत होणार आहे. कौतुकास्पद सामाजिक कार्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि जनतेतून सेवास्पर्श फाऊंडेशनचे विशेष आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर तरुण आणि सामाजिक संस्थांनीही या काळात पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या आवाहनाला नेहमीच प्रतिसाद असेल

जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत रक्त मिळावे आणि रक्ताभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आमच्या सेवास्पर्श फाऊंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले असून, आगामी काळातही अशा उपक्रमांना आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील. असे सेवास्पर्श फाऊंडेशन अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom