Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचार आणि प्रलंबित लाभ या विरोधात राज्यभर 'आक्रोश आंदोलन करणार....!

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचार आणि प्रलंबित लाभ या विरोधात राज्यभर 'आक्रोश आंदोलन करणार....!


बांधकाम कामगार महासंघ, प्रदेश कार्यकारिणीत निर्णय

पुणे : ​बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कथित भ्रष्टाचारी योजना आणि नोंदीत कामगारांचे प्रलंबित लाभ याविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पूणे येथे भारतीय मजदूर संघ कार्यालय येथे घेण्यात आली या बैठकीत बांधकाम मंडळाच्या गलथान कारभारा विरोधात महाराष्ट्रभर जिल्हास्तरावर 'आक्रोश आंदोलन' करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री भगवान साटम यांनी दिली.

बांधकाम कामगार महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक महासंघाचे अध्यक्ष श्री हरी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नूकतीच भारतीय मजदूर संघ कार्यालय पूणे येथे पार पडली. या बैठकीला पश्चिम क्षेत्र सह संघटनमंत्री श्री मोहन येणूरे, भारतीय मजदूर संघ प्रदेश महामंत्री श्री किरण मिलगीर, असंघटित क्षेत्र सह प्रभारी श्री श्रीपाद कुटासकर, महासंघ कोषाध्यक्ष श्री बाळकृष्ण कांबळे, महासंघ सरचिटणीस श्री रविंद्र माणे, संघटनमंत्री श्री संजय सुरोश, यासोबतच राज्यातील इतर १० जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. ​


बैठकीत महासंघाच्या प्रदेश स्तरावरील संघटनात्मक बांधणीवर आणि काम वाढीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या गलथान कारभारावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, मंडळामार्फत सध्या दिल्या जाणाऱ्या वस्तुरूपी लाभांमध्ये, तसेच आरोग्य तपासणी आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली मंडळाच्या निधीचा प्रचंड गैरवापर व भ्रष्टाचार होत आहे. वास्तविक पाहता, नोंदीत बांधकाम कामगारांना थेट आर्थिक लाभ (DBT) देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवून व त्यात जाचक अटी लादून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. प्रसूती लाभ, गंभीर आजार या सारख्या कल्याणकारी योजना ठेकेदार एजन्सींच्या दावणीला बांधून भ्रष्टाचार केला जात आहे. बांधकाम मंडळाचे सध्याचे काम हे केवळ ठेकेदार एजन्सींना फायदा पोहोचवण्यासाठी सुरू आहे.
​
नोंदीत बांधकाम कामगारांना थेट आर्थिक लाभाच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. वस्तुरूपी लाभ, संशयास्पद आरोग्य तपासणी आणि बोगस प्रशिक्षणासारख्या भ्रष्टाचारी योजना तात्काळ बंद करण्यात याव्यात. मंडळाच्या पैशांची होणारी उधळपट्टी आणि लूट त्वरित थांबवण्यात यावी. कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात भव्य 'आक्रोश आंदोलन' उभारून तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार या बैठकीत एकमुखाने करण्यात आल्याची माहिती श्री साटम यांनी दिली.

ठेकेदार एजन्सींच्या दावणीला कल्याणकारी योजना बांधून भ्रष्टाचार...!

बांधकाम मंडळा मार्फत यापूर्वी प्रथम दोन जीवत कामगारांच्या अपत्याला प्रसुती लाभ रक्कम दिली जात होती तसेच कामगार व कुटुंबीय यांना गंभीर आजार यासाठी रु १ लाख आर्थिक मदत दिली जात होती. परंतु सद्यस्थितीत या योजना ठेकेदार एजन्सीच्या दावणीला बांधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. या योजनेचा लाभ घेताना बांधकाम कामगारांना फार अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ruchira top