Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

पहाटे रस्त्यावर सापडलेले ते बालक अखेर आईच्या स्वाधीन.....

पहाटे रस्त्यावर सापडलेले ते बालक अखेर आईच्या स्वाधीन.....


तब्बल ७ तास राबवली शोध मोहीम : मालवण पोलिसांसह स्थानिकांचा सहभाग

मंगेश नलावडे | मालवण :
मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे ५  वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा मुलगा (बालक)  दिसून आले. भटक्या कुत्र्यांनी त्या बालकाला घेरले होते. दरम्यान मालवण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन मालवण ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी करून वैद्यकीय निरराणी खाली ठेवले. त्या मुलाच्या पालकांचा शोध सुरु करण्यात आला. तब्बल सात तास शोध मोहीम नंतर मुलाच्या पालकांचा शोध लागला. बस स्थानक मागे राहणाऱ्या एका कामगार कुटुंबातील हे बालक असल्याचे स्पष्ट झाले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना बालक घराबाहेर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

मालवण भरड परिसरात बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरलेल्या स्थितीत दीड ते दोन वर्षाचा मुलगा आढळून आला होता. सुदैवाने त्या मुलाला त्या भटक्या कुत्र्यांकडून कोणतीही दुखापत झाली नाही. मालवण पोलिसांना या बाबत माहिती मिळताच तातडीने मालवण भरड येथे दाखल होत.त्या मुलाला ताब्यात घेऊन मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.तर त्या मुलाचे पालक कोण याचा शोध घेतला जात होता. मालवण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा चेक करण्यात येत होती. पोलीस प्रशासना सोबत स्थानिक नागरिकांनी ही त्या मुलाच्या आई वडिलांच्या शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले.

मालवण भरड परिसरात आढळून आलेला मुलगा हा मालवण एसटी स्टॅण्ड मागील परिसरात राहणारे परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना मुलगा घरा बाहेर गेला.. सुदैवाने तो मुलगा भटक्या कुत्र्यां पासून बचावला आहे. ७ तासाच्या शोध मोहिमे नंतर आई आणी मुलाची भेट झाली.

rapan bottom