Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या रूपाने जनहिताच्या ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मालवण-कुडाळला लाभले!

आमदार निलेश राणे यांच्या रूपाने जनहिताच्या ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मालवण-कुडाळला लाभले!

अवैध धंद्यांविरोधात त्यांनी मांडलेली भूमिका जनतेच्या भावना स्पष्ट करणारी

आमदार निलेश राणे समाजहिताचा व्यापक विचार करणारे लोकनेतृत्व

पर्यटन व मत्स्य व्यावसायिक सतीश आचरेकर यांनी व्यक्त केल्या जनतेतील प्रतिक्रिया

मालवण : कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने गतिमान विकासाचा दृष्टिकोन ठेवून योग्य नेतृत्वाच्या हातात सत्ता दिल्यामुळे आज आमदार निलेश राणे यांच्या रूपाने सडेतोड, स्पष्टवक्ते आणि जनहिताच्या दृष्टीने ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मतदारसंघाला लाभले आहे. अवैध धंद्यांविरोधात त्यांनी ठामपणे मांडलेली भूमिका ही जनतेच्या भावना स्पष्ट करणारी आणि समाजहिताचा व्यापक विचार करणारी असल्याचे सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. अशी प्रतिक्रिया मालवण येथील पर्यटन व मत्स्य व्यावसायिक सतीश आचरेकर यांनी व्यक्त केली आहे.

अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर प्रकारांमुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाकडे वळत असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालल्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम कुटुंब व्यवस्था, सामाजिक वातावरण आणि युवकांच्या भविष्यावर होत असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग पोलिस दलातील काही घटकांकडून कथितपणे हप्ते घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना काही स्तरांवरून संरक्षण मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य निश्चितच जनतेसमोर येईल.

समाजात वाढत असलेल्या या गंभीर समस्यांवर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी आणि युवकांना सुरक्षित, सकारात्मक वातावरण मिळावे, हीच समाजाची अपेक्षा आहे.
एकूणच आमदार निलेश राणे यांनी मांडलेले मुद्दे हे केवळ राजकीय नसून सामाजिक जाणीवेतून व्यक्त करण्यात आले.

विकासाचे व्हिजन

कुडाळ-मालवण मतदारसंघ गेल्या दहा वर्षांत अनेक क्षेत्रांत अपेक्षित गतीने विकास न झाल्याने मागे पडल्याची भावना भावना जनतेमध्ये होती. पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यटन, शिक्षण आणि विविध विकासकामांच्या बाबतीत निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, आमदार निलेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विकासकामांना गती मिळाली. मोठा विकासनिधी प्राप्त करण्यात ते यशस्वी ठरले. मतदारसंघातील रस्ते, पर्यटनवाढ, स्थानिक प्रश्न, युवकांसाठी संधी आणि विकासकामांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. गतिमान विकास प्रक्रियेत आमदार निलेश राणे यशस्वी ठरले. विकास आणि समाजहित या दोन्ही मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे.

समाजहिताच्या प्रश्नांवर तत्पर काम

समाजातील वाढत्या समस्यांविरोधात स्पष्ट भूमिका घेणे, युवकांच्या भवितव्याचा विचार करणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने आग्रही राहाणे, विकासनिधी खेचून आणणे ही लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आमदार निलेश राणे हे योग्य प्रकारे पुर्ण करत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने योग्य नेतृत्वाच्या हातात सत्ता दिल्यामुळे आज आमदार निलेश राणे यांच्या रूपाने सडेतोड, स्पष्टवक्ते आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मतदारसंघाला लाभल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. समाजहिताच्या प्रश्नांवर तत्पर काम करण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांच्या पसंतीस उतरली असून, विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. असेही सतीश आचरेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत |मालवण

rapan bottom