मालवण नगरीचे उपनगराध्यक्ष कार्यसम्राट नेतृत्व दिपक पाटकर वाढदिवस अभिष्टचिंतन
जनतेची सेवा हेच पहिले कर्तव्य असले पाहिजे.... या राणे साहेबांच्या शिकवणी प्रमाणे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत जनसेवेसाठी कायम तत्पर असणारे मालवण नगरीचे उपनगराध्यक्ष कार्यसम्राट नेतृत्व दिपक पाटकर जनसामान्यांना आपले वाटतात. आपल्या घरातील सदस्य वाटतात. सेवाभावी वृत्तीतून एक विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला आहे. दिपक पाटकर यांना एक कॉल.... म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी भावना अनेकजण व्यक्त करतात. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर अश्या या लोकनेतृत्वाचा आज वाढदिवस....!
खासदार नारायण राणे साहेब यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनात तसेच पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून लोकसेवा करतं असताना मालवण शहाराचा सर्वांगीण विकास हाच फोकस दिपक पाटकर यांचा कायम दिसून येतो. आपल्या तत्पर आणि लोकोपयोगी सेवा कार्यातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटवला. कार्यसम्राट नगरसेवक हा जनतेने बहाल केलेला बहुमान खऱ्या अर्थाने सार्थ ठरतो.
मालवण नगरपरिषद तीन वेळा नगरसेवक, पाणी पुरवठा सभापती, उपगराध्यक्ष ही त्यांची वाटचालीस त्यांच्या कार्याची पोचपावती ठरते. शिवसेना मालवण शहरप्रमुख म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना संघटना मजबुती यातही पाटकर यशस्वी ठरले.
पक्ष कार्यालय, उपनगराध्यक्ष दालन हे जनतेच्या सेवेसाठीच असले पाहिजे या आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार दिपक पाटकर सातत्याने सेवाभावी वृत्तीने 24 तास कार्यरत असतात. जनतेशी असलेला त्यांचा संपर्क मोठा आहे. शहरा सोबत ग्रामीण भागातही त्यांची नाळ जुळलेली आहे. म्हणूनच प्रत्येकाला ते आपले वाटतात.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहर विकास आणि जनसेवा हाच लक्ष आणि हाच ध्यास घेऊन सेवाभावी वृत्तीने जनसेवा करणाऱ्या दिपक पाटकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
▪️अमित खोत | मालवण

एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह....
