Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

कर्तृत्ववान डॅशिंग नेतृत्व !

कर्तृत्ववान डॅशिंग नेतृत्व !


माजी सभापती सुनील घाडीगांवकर वाढदिवस अभिष्टचिंतन...

१९९० साली तत्कालीन आमदार माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिरवंडे गावचे शाखाप्रमुख म्हणून सुनील घाडीगांवकर यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास सरपंच ते तालुका सभापती पदापर्यंत गवसणी घालतो... आपल्या कर्तृत्ववाच्या जोरावर तालुक्याचे सभापती पद भूषवताना एक आक्रमक, आदर्श व डॅशिंग नेतृत्व म्हणून सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण करतो... खरोखरच मालवण तालुक्याला अभिमान वाटावा असे हे नेतृत्व जन सेवेसाठी व ग्राम विकासासाठी नेहमीच तत्पर राहिले. अश्या या लोकनेतृत्वाचा आज वाढदिवस.

१९९० पूर्वी ज्या गावात डांबरी रस्तेच नाहीत... शहराला जोडणारी दळणवळण साधनेही अगदी मोजकीच आणि तीही सकाळच्या वेळीच... रात्रीची तर भयाण शांतता... डोंगरी क्षेत्रातील या भागात शेती, काजू, कोकम यावरच उदरनिर्वाह करणारी कुटुंबे... मालवण तालुक्याच्या सीमेवर डोंगरावर वसलेले शिरवंडे गाव विकासापासून कोसो दूर होते. मात्र या गावच्या सर्वांगीण विकासासाठी, संपुर्ण विभागच सुजलाम सुफलाम व्हावा हे धेय्य डोळयासमोर ठेवून वाटचाल करणारे व खऱ्या अर्थाने शिरवंडे गाव परिसर विकासाच्या वाटेवर स्वार करणारे.... कर्तृत्ववान नेतृत्व विकासाभिमुख डॅशिंग व्यक्तिमत्व शिरवंडे गावचे सुपुत्र माजी सभापती सुनील घाडीगांवकर हे होय. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गावात सुबकता आणताना ग्रामीण विकासाचे स्वप्न सत्यात उतरवत येथील गावांना विकासाच्या वाटेवर स्वार करण्यात सुनील घाडीगावकर यांनी महत्वाची भुमिका बजावली. गावचे सरपंच ते मालवण तालुका सभापती म्हणून नेतृत्व करत असताना विकासाचा दृष्टिकोन व जनतेचे प्रश्न सोडवण्याची असलेली त्यांची तळमळ आदर्शवत राहिली. सभागृहात अभ्यासू आणि मुद्देसूद मांडणी. आक्रमक भुमिका नेहमीच दिसली. प्रशासनातही त्यांचा वचक नेहमीच राहिला. एकूणच राजकारण, समाजकारण आणि सेवाकार्य यात सिंधुदुर्गच्या पटलावर अग्रक्रम असणाऱ्या व्यक्तींच्या पंक्तीत सुनील घाडीगांवकर हे नाव प्राधान्य क्रमाच्या यादीत घ्यावेच लागेल....

१९९० साली तत्कालील आमदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगांवकर यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. तत्कालीन तालुकाप्रमुख दत्ता सामंत यांची खंबीर साथ व मार्गदर्शन घाडीगांवकर यांना मिळाले. शिरवंडे गावा सोबत विभागाचा, तालुक्याचा विकास हेच धेय्य ठेवून सुनील घाडीगांवकर यांचा राजकीय व सामाजिक प्रवास सुरु राहिला.

सुनील घाडीगांवकर यांनी नेहमीच जन हिताला प्राधान्य दिले. माणसे जोडली. त्यांच्यात असलेली विकासाची तळमळ, अभ्यासूपणा व आक्रमकता पाहता त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून नेतृत्व करण्याची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यावेळी दिली.
त्या संधीचे सोने करत गावचे सरपंच, पुन्हा पंचायत समिती सदस्य, सभापती, त्यानंतर पत्नी सोनाली जिल्हा परिषद सदस्य, २०१७ पासून पुन्हा पंचायत समिती सदस्य व सभागृह गटनेते ही जबाबदारी घाडीगांवकर यांनी यशस्वीपणे सांभाळली. सभागृहातील त्यांची आक्रमकता, सर्व सदस्यांना सोबत घेऊन जाण्याचे कसब, जनतेचे प्रश्न सातत्याने मांडून त्याचा केलेला निपटारा. विकासाचा दृष्टिकोन व धमक हे सर्व गुण पाहता एक आदर्श राजकीय नेतृत्व म्हणून घाडीगांवकर यशस्वी ठरले. लोकसभा, विधानसभा वं अन्य सर्व निवडणुकीत मताधिक्य देणारा मतदारसंघ अशी या भागाची ओळख राणे साहेबांच्या आशीर्वादाने वं दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात घाडीगांवकर यांनी निर्माण केली.

सर्व निवडणुकीत (ग्रामपंचायत ते लोकसभा) या मतदारसंघाने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच मताधिक्य दिले. नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीर राहणारा मतदारसंघ अशी हिवाळे आडवली मालडी मतदारसंघाची ओळख झाली. या यशात अनेक सहकारी, जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. सर्वांची भक्कम साथ व ग्रामस्थांचा विश्वास हेच यशाचे सूत्र असल्याचे सुनील घाडीगांवकर आवर्जून सांगतात. अनेक सहकारी यांचाही विशेष उल्लेख ते नेहमी करतात. सोबतच मिळालेल्या यशात जनतेची साथ मोलाची असल्याचे ते नेहमीच सांगतात.

नुकत्याच्या पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौं. सोनाली घाडीगावकर यां बहूमतांनी विजयी झाल्या. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण तालुक्यात विरोधकांना भुईसपाट करतं शिवसेना भाजपा महायुतीने मोठा विजय नोंदवाला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सुनील घाडीगांवकर यांच्यावर जनतेचा असलेल्या विश्वासाचा हा विजय ठरला. विकासाभिमुख दृष्टिकोनाचा हा विजय ठरला.

या जिल्हा परिषद मतदार संघाचा विचार करता आडवली मालडी हा जिल्हा परिषद मतदारसंघ मालवणसह देवगड, कणकवली, कुडाळ या चार तालुक्याना जोडतो. प्रामुख्याने डोंगरी व जंगलमय असा हा भाग. मात्र यां भागातील जनतेच्या सुख दुःखात सोबत राहून विकास साध्य करण्याचे काम १९९० पासून सुनील घाडीगावकर करतं आहेत. जनता हेच कुटुंब मानून त्यांनी काम केले. म्हणूनच मतदारसंघात विकासकामांचा आलेख चढता राहिला.

गावात प्रत्येक वाडीवर रस्ते, प्रमुख रस्ते, वीज, पाणी, बंधारे आदी मूलभूत सोई सुविधांसह अनेक शासकीय योजना, गावात राबवून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम सुनील घाडीगांवकर, सोबली घाडीगावकर यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. येथील शिरवंडे व परिसरातील गावात काजू, कोकण पीक मोठ्या प्रमाणावर होते. या पिकांमध्ये वाढ करून काजू व कोकमवर प्रक्रिया करणारे उदोग गावात सुरू झाल्यास रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढीस गती मिळेल, या दृष्टीने घाडीगांवकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या बरोबर दूध उत्पादनात वाढ करून दूध संकलन करून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देणे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. डोंगरी भागात साग व बांबू लागवड वाढवणे, शेतीत भुईमूग व भाजीपाला लागवड वाढवणे, त्यासाठी सिंचन योजना गावात आणण्याचा प्रयत्न आहेत. गावच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान असून यापुढेही लाभणार आहे. येत्या काही वर्षात शिरवंडे गांव व आडवली मालडी जिप मतदारसंघ कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून अग्रेसर बनवणे, गाव परिसर सुजलाम सुफलाम बनवणे हेच लक्ष राहणार आहे. असे घाडीगांवकर सांगतात.

'जनता हे माझे कुटुंब आहे'
याच भावनेतून अखंडित सेवकार्य करणारे.... थोडासा चिडखोर स्वभाव असला तरी जनते बद्दल माया आणि आपुलकी सुनील घाडीगावकर यांच्या मनात खोलवर रुजली आहे. मतदार संघातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन सुनील घाडीगावकर यांचा प्रवास सुरु आहे.

जनतेत राहून जनतेच्या सेवेसाठी तसेच गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासाचे धेय्य डोळ्यासमोर ठेवून तन, मन व धन अर्पून अखंडित
सेवाकार्य करणाऱ्या या लोकनेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो...!


▪️अमित खोत,
पत्रकार मालवण

rapan bottom