युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांचा स्वागत सत्कार
मालवण : कार्यकर्त्यांना जपणारे त्यांना बळ देणारे नेतृत्व अशी विशेष ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सिंधुदुर्ग युवा सेना, युवतीसेना यांनी अनुभवला.
ठाणे येथे शिवसेना नेते आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने संकल्प प्रतिष्ठान माध्यमातून दुर्गा देवीचा मोठा उत्सव आयोजित केला जातो. या सोहळ्याच्या निमित्ताने तसेच पक्ष कामानिमित्ताने ठाणे येथे आलेल्या सिंधुदुर्ग युवासेना (कुडाळ मालवण) जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत तसेच सिंधुदुर्ग युवतीसेना जिल्हाप्रमुख (कुडाळ मालवण) सौ. सोनाली पाटकर यांना विशेष आमंत्रित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा स्वागत सत्कार केला. कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व ही मुख्यमंत्री यांची ओळख सामंत पाटकर यांनी प्रत्यक्ष अनुभवली. या सत्कार सन्मानाने सामंत व पाटकर हे भारावून गेले.


यावेळी शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सिंधुदुर्ग कुडाळ विधानसभा निरीक्षक दीपक वेतकर, सिंधुदुर्ग जिल्हा मा. सचिव किसन मांजरेकर, नम्रता फाटक मॅडम यांसह शिवसेत नुकतेच प्रवेशकर्ते मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सौ. स्मृती कांदळगांवकर यांसाठी अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

