Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

ट्रॅव्हल व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

ट्रॅव्हल व्यावसायिक तरुणाची आत्महत्या


मालवण वायरी येथील घटना : पोलिसांकडून अधिक तपास सुरु

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील ट्रॅव्हल व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९, मूळ रा. सर्जेकोट, मालवण; सध्या रा. वायरी भूतनाथ, मालवण) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रवीवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान यां प्रकारणी पोलीस अधिक तपास करतं आहेत.

वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहणाऱ्या रुपेश कुर्ले यांनी बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुपेश हा गेल्या १० वर्षांपासून वायरी भूतनाथ येथे भाड्याची खोली घेऊन एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी रेश्मा ही आपल्या दोन मुलींसह मूळ गावी सर्जेकोट येथे राहते. काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रुपेशचे मॅनेजर अक्षय सरमळकर यांनी रुपेशच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती त्याचा भाऊ महेश कुरले यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे वैभव कल्याण आजगावकर (वय २९, रा. सर्जेकोट) यांना फोनवरून दिली.

मॅनेजरचा फोन आल्यानंतर वैभव आजगावकर तातडीने वायरी भूतनाथ येथील रुपेशच्या खोलीवर पोहोचले. तेथे दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खोलीच्या खिडकीतून लांब काठी घालून दरवाजाची कडी आतून उघडली. आत जाऊन पाहिले असता रुपेश याने किचनमधील पंख्याच्या हुकाला बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

हा प्रकार उघडकीस येताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुपेशला तातडीने खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी वैभव आजगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर करत आहेत. रुपेशच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

rapan bottom