नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार
मंगेश नलावडे | मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करत असताना कॉँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात व सर्वांच्या सोबतीने पुन्हा एकदा कॉँग्रेस संघटन नव्या जोमाने वाढवूया. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी उपस्थिती जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विलास गावडे,जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबूलकर, सेवादल जिल्हा समन्वयक अजिंक्य गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, विद्याप्रसाद बांदेकर,जिल्हा सरचिटणीस रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर, वि. के. सावंत, महेश तेली, शांताराम नेवरेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस, कणकवली प्रदीप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सावंतवाडी अभय मालवणकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा सचिव दोडामार्ग माजी तालूकाध्यक्ष कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, संजय लाड, सुरज घाडी, ओबीसी जिल्हा समन्व्यवयक प्रवीण आचरेकर, तबरेज शेख, चंदन पांगे, उल्हास शिरसाठ, यश तेली, बाळा शिरोडकर, प्रमोद घाडीगावकर, लक्ष्मण शिरोडकर,सोशल मीडिया जिल्हा समन्वयक केतनकुमार गावडे, उमेश मोंडकर, शेलटकर, आनंद परुळेकर, अतिश उर्फ भाई जेठे, अमृत राऊळ, केदार केळूसकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

