टेंडरसाठी लाचार असणाऱ्यांनी नितीन पवार यांच्यावर बोलू नये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा उपशहर प्रमुख छोटु पांगे यांनी सुनावले
आमदार वैभव नाईक जनतेच्या आशीर्वादाने जिल्ह्याचे पालकमंत्री होणार : व्यक्त केला विश्वास
आचरा : खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक नितीन पवार यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यावर भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांनी बोचरी टीका केली होती. या टीकेचा चांगलाच समाचार आचरा उपशहरप्रमुख छोटु पांगे यांनी घेतला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पांगे म्हणाले, नितीन पवार हे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना कशाचीही अपेक्षा न करता एक शेतकरी म्हणून कार्यरत आहेत. प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाला माहित नसतो कारण अभी लाड सारखे शायनर हेच आयत्या बिळावरचे नागोबा दिसतात. टेंडरसाठी लाचारी करणारे, नेत्यांनी दिवसभर भेट दिली नाही तरी टेंडरसाठी बंगल्याची राखण करतात. अभी लाड यांनी दुसऱ्याची पात्रता काढण्यापेक्षा स्वताची लायकी बघावी. राणे साहेबांच्या पडत्या काळात मुंबईत लपून बसणारे नाराजीचा सूर लावणारे लाड कुटुंबीय पाऊस पडला की बेडूक ओरडतात तशी परिस्थिती अभी लाड यांची आहे. उद्या विधानसभेच्या पराभवानंतर अभी लाड टेंडर साठी स्वतःच्या नेत्यांची ओळखही सांगणार नाहीत. श्रावण ग्रामपंचायत एक हाती शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. याचही भान अभी लाड याना असेलच. आमदार वैभव नाईक हेच जनतेच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचे उद्या पालकमंत्री असतील हे निश्चित आहे असे छोटू पांगे यांनी सांगितले.

