Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज व गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज व गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत


त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये

मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम

पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही

कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी

कणकवली ;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याच गुन्हेगाराला कधीही साथ दिलेली नाही. कोणाला पाठीशी घातले नाही. आज जो काही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज आणि गांजा मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस रात्र एक करत आहेत. त्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये. असा सज्जड इशारा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला शिस्त व कायदा सुव्यवस्था हाताळण्यात राज्याला पुढे आणत आहे. कोणताही गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला माहिती आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्या राज्यामध्ये आपली सुटका होणार नाही हे माहित असल्याने कोणतेच गुन्हेगार तशी हिम्मत परत करत नाहीत. अशा पद्धतीची भीती सर्वच गुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र राज्यात बसलेली आहे.


खात्यातील काही अधिकारी हे चुकीचं काम करत असतील तरी त्या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय बारीक लक्ष असते.आमदार म्हणून मंत्री म्हणून आम्ही असंख्य वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्यामध्ये असलेले काही निकृष्ट अधिकारी, भ्रष्टाचारी अधिकारी असतील त्यांना शिक्षा देत असताना आणि जागेवर सस्पेंड करताना स्वतः पाहिलेल आहे आणि अनुभवलेल देखील आहे.

जे काही आरोप आमदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांवर केले आहेत त्याबाबतीत आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती पोहोचवणार आहोत, कुठेही चूक झाली असेल तर निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणाला सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे.असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

rapan bottom