Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा | भारतासाठीही अत्यंत अभिमानाचा क्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा | भारतासाठीही अत्यंत अभिमानाचा क्षण


हाँगकाँग येथील आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत कणकवली तालुक्यातील १२ वर्षीय मंथन पराग उकर्डे याची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली : हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत कणकवली तालुक्यातील १२ वर्षीय मंथन पराग उकर्डे याने उल्लेखनीय कामगिरी करत सहावे स्थान पटकावले. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून भारतासाठीही ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या स्पर्धेसाठी प्रत्येक गटातून भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरिता केवळ दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. १२ वर्षांखालील गटात कणकवलीचा सुपुत्र मंथन उकर्डे याची निवड होणे आणि त्यानंतर आशियाई स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.


स्पर्धेनंतर भारतात परतल्यानंतर मंथन व त्याच्या कुटुंबीयांनी आज कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंथनचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही मंथनने दमदार कामगिरी करावी यासाठी त्याला प्रोत्साहन देत आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास उकर्डे कुटुंबीयांना दिला.


मंथनच्या या यशामुळे सिंधुदुर्गातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

rapan bottom