Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

32 वर्षांनंतर माजी विद्यार्थी रमले शालेय आठवणींत

32 वर्षांनंतर माजी विद्यार्थी रमले शालेय आठवणींत


ओझर विद्यामंदिर कांदळगाव 1993-94 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

मालवण : ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या 1993-94 दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे बाळासाहेब जगताप सर, शोभा मसुरकर-पेडणेकर मॅडम, पांडुरंग राणे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी भास्कर पाताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

या स्नेह मेळाव्यास शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, प्रशालेचे मुख्याध्यापक डी.डी.जाधव, प्रशालेचे शिक्षक शिवराम सावंत, प्रविण पारकर, लिपिक रविराज जाधव, स्थानिक स्कूल समिती सदस्य विशाल राणे आदी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. स्नेह मेळाव्याच्या सुरुवातीला प्रशालेतील दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व या बॅचमधील दिवंगत मित्र यांना आदरांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर या बॅचला अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आदर-सत्कार करण्यात आला.

गुरुजनानी मांडल्या भावना

यावेळी जगताप सर यांनी 32 वर्षांनंतरही माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेला स्नेह जपत आपली आठवण केली, याबद्दल भावोत्कट विचार मांडताना या विद्यार्थ्यांमुळे आपण शिक्षक म्हणून घडत गेलो. आजही तेच हसरे, खोडकर चेहरे आपल्याला आठवतात...असे सांगत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शोभा मसुरकर-पेडणेकर मॅडम यांनी आजही तेवढ्याच प्रेमळ, हळुवार व समजुतदार शब्दांत माजी विद्यार्थ्यांशी असलेला स्नेहबंध उलगडला. अनेक दाखले देत व किस्से सांगत असे स्नेहमेळावे व माजी विद्यार्थ्यांची भेट आपल्या जगण्याची उमेद वाढवते, नवी उर्जा देते असे सांगितले. या माजी विद्यार्थ्यांनी आजच्या काळात आपल्या बदलत्या भूमिका समर्थपणे पार पाडाव्यात यासाठी मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे साहाय्यक शिक्षक व माजी विद्यार्थी पांडुरंग राणे यांनीही माजी विद्यार्थ्यांनी शाळेकडे मागे फिरुन पाहण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगत शाळेच्या भविष्यकालीन भौतिक गरजांकरीता आपण भविष्यातही अशीच साथ द्यावी असे आवाहन केले. शालेय स्थानिक समिती अध्यक्ष किशोर नरे यांनी माजी विद्यार्थी स्नेहमेळावे आयोजित करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो आपल्या या बॅचचा स्नेहमेळावा शाळेच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार काढले व शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक डी.डी.जाधव यांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाळेकडे मागे वळून पाहण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून असे मेळावे विद्यमान परीस्थितीत शाळेच्या विकासासाठी फार मोलाचे योगदान देतात असे सांगितले.

माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने 1993-94 बॅचकडून प्रशालेच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त भौतिक गरजापूर्तीकरिता देणगी म्हणून रोख रक्कम एकवीस हजार रुपये प्रशालेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी नागेश तोंडवळकर, किशोर वालावलकर,प्रविण ढोलम, उज्ज्वला मांजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशाला व गुरुजनां विषयीच्या आठवणींचा पट उलगडला. यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी रश्मी राणे, शुभांगी तारी, किर्ती चेंदवणकर, निता सादये, उज्ज्वला मांजरेकर, अमोल परब, मधुसूदन परुळेकर, आनंद रावले, किशोर तांडेल, नागेश तोंडवळकर, प्रविण ढोलम, किशोर वालावलकर, वृंदा आळवे, विजया परब, संगिता लाड, सुजाता पाटील, भगवान गांवकर, नंदकुमार कोचरेकर, सुहास साळकर, राजन कदम, सुनील मांजरेकर, विनोद मांजरेकर,आनंद कोचरेकर, किशोर पवार, संजय कांदळगांवकर, शुभांगी वेंगुर्लेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक किशोर वालावलकर यांनी केले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom