युवा व्यक्तिमत्व विकास वर्ग : 31 मे रोजी मालवण येथे आयोजन : प्रवेश विनामूल्य
मालवण :- सनातन संस्थेच्या वतीने ३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजता कन्याशाळा धुरीवाडा मालवण येथे आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी युवा व्यक्तिमत्व विकास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

सनातन संस्थेच्या या सामाजिक उपक्रमात युवा व्यक्तिमत्व विकास वर्गात, नीती मूल्य संवर्धन, वेळेचे नियोजन, राष्ट्र कर्तव्याचे जागरण, आदर्श व्यक्तिमत्व, विकास, स्वभावदोष व गुणसंवर्धन या बाबत मार्ग दर्शन होणार आहे. यात १६ ते ३० वयोगटातील युवा वर्ग सहभागी होऊ शकतात. अधिक माहिती साठी 9370337956 या नंबर वर संपर्क करावा. असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️अमित खोत | मालवण

