मालवण : इंधन दरवाढ व इंधन टंचाई बाबत शुक्रवार 29 मे रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे तसेच त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पत्रकार भवन, ओरोस येथे दुपारी १२. ३० वा. बैठक - चर्चासत्र होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकसभा - विधानसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा पदाधिकारी, सर्व सेल - विभाग (महिला, युवक, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्यांक, NSUI व इतर ) पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, आजी - माजी नगरसेवक, जि. प, पं. स, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

इंधन दरवाढ व टंचाईबाबत काँग्रेस देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
