Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

हुमारमळा-वालावल येथील रामेश्वर विद्यामंदिरचे भूमिपूजन

हुमारमळा-वालावल येथील रामेश्वर विद्यामंदिरचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांनी दिला २० लाख निधी

अतुल बंगे यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ : हुमरमळा-वालावल येथील रामेश्वर विद्या मंदिर शाळा बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे साठ वर्षांची मागणी पुर्ण होत ग्रामस्थांच्या उपस्थितीत भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सदस्य अतुल बंगे यांनी केले.

हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नविन बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी पडोसवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार २० लाख रुपयांचा निधी दिला आहे. शाळेचे  भुमिपुजन  अतुल बंगे, सरपंच अमृत देसाई, उद्योजक प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ  शरद वालावलकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने श्री बंगे यांचा ज्येष्ठ ग्रामश शरद वालावलकर यांच्या हस्ते  शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांनी  सत्कार करण्यात आला. यावेळी श्री बंगे यांनी सांगितले कि, आमदार वैभव नाईक यांनी नेहमीच विकासासाठी निधी मागितला तसा उपलब्ध करून दिला.  म्हणुनच आज हुमरमळा ग्रामपंचायत भव्य दिव्य होत आह. देसाई वाडा पुल बांधुन पुर्ण झाले आहे. बिजोळे वाडी पुलासाठी १९ लाख निधी मिळाला आहे. बांधकोंड ते बिजोळेवाडी रस्ता ९ लाख रुपये खर्चून पुर्ण झाला आहे. बिजोळेवाडी साठी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अशी कितीतरी विकास कामे मार्गी लावली असुन आज साठ वर्षांनी या नविन शाळा  बांधकामाचे  ग्रामस्थांचे स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे पालकांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
     यावेळी सरपंच अमृत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. हुमरमळा गावातील जेष्ठ उद्योजक मसाला उद्योजक प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, शरद वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दीप्ती दयानंद परब, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव, दत्ता गुंजकर, दिपा गुंजकर, सौ परब, श्री प्रविण मार्गी, पांडु गुंजकर, दाजी चव्हाण, आशु बंगे, आदीती देसाई, मिताली देसाई, भारती परब, राजन कद्रेकर, शेजल गुंजकर, नाथा राणे, भिवा गुंजकर आदी उपस्थित होते.

ruchira top