सु. टो. अध्यापिका विद्यामंदिर मालवण
मालवण : सु. टो. अध्यापिका विद्यामंदिर, मालवण संचलित डी.एल.एड. (डी.एड.) कॉलेज, मालवण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी असून पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
महिला व पुरुष विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किमान ४४.५० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४९.५० टक्के गुण आवश्यक आहेत.
प्रवेशासाठी दहावी-बारावी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच दोन रंगीत छायाचित्रे आवश्यक असल्याची माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.
महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील नामांकित शिक्षक शिक्षण संस्थेचा समावेश असून गेली अनेक वर्षे अध्यापन क्षेत्रात आदर्श शिक्षक घडविण्याचे कार्य संस्था करत आहे. जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांमध्ये अनेक माजी विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अत्याधुनिक साधनसामग्री, अनुभवी प्राध्यापक वर्ग, संगणक व इंटरनेट सुविधा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे डी.एल.एड. अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना YCMOU मार्फत B.A./B.Com करण्याची संधी व मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बी.ए, बी. काॅम, बी. एस. सी, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा D. Ed ला प्रवेश घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्राचार्य डी. एम. माळी,९४२२२६०६५२, प्रा. एन. आर. कदम, ९४२००२९२५१, प्रा. सौ. पी. ए. शिरसाट,७८२२९२१६३८, प्रा. आर. एस. वळवी, ९४०५८३२४३७, प्रा. सौ. ए. आर. योगळे,७५८८११३९७९, श्री. एस. एल. जाधव, ९४२०८२२८११ तसेच श्री. आर. एम. मालवणकर,९१५८१३३४०७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणमध्ये डी.एल.एड. प्रवेश प्रक्रिया सुरू
