Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा मतदार मॅपिंग प्रक्रियेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

सिंधुदुर्ग जिल्हा मतदार मॅपिंग प्रक्रियेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण

सिंधुदुर्गनगरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (SIR-2026) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वित प्रयत्नांमुळे सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (BLO) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे.

निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली.

तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

rapan bottom