यावर्षी पर्यटन हंगामाच्या शेवट पर्यत पोषक समुद्री हवानमानमुळं सागरी पर्यटन व सर्व पर्यटन स्थळे बहरली
मंगेश नलावडे | मालवण : या वर्षाचा पर्यटन हंगामाच्या शेवट पर्यंत मालवणात पर्यटकांचा ओघ कायम आहे, वाढता आहे. समुद्री हवामानही पोषक असल्याने किल्ले दर्शन सह, मालवणचे समुद्रकिनारे, स्कुबा डायव्हिंग पॉईंट, जलक्रीडा याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी कायम आहे. मालवणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असल्याने मालवण पर्यटकांनी बहरले आहे.

मालवण येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले राजकोट,
स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, निसर्गसौदर्य, जलक्रीडा, कृषी वं धार्मिक पर्यटन तसेच मालवण पद्धतीची चविष्ट खाद्य संस्कृती पर्यटकांच्या पसंतीत उतरत आहे. मालवण शहरा बरोबरच देवबाग तारकर्ली वायरी सर्वच याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आहे.

येथील त्सुनामी बेट, देवबाग संगम, तारकर्ली बिच, चिवला बिच, दांडी किनारपट्टी, आचरा बिच, किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट किल्ला परिसर तसेच मालवण रॉक गार्डन, घुमडे येथे मोठी पसंती पहावयास मिळत आहे. सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत मालवणातील पर्यटन स्थळा जवळ पर्यटकांची वर्दळ कायम असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने आपली किरकोळ हजेरी लावली त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा पर्यटन हंगाम अधिक बहरला आहे.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि पार्कींग च्या समस्या मालवणात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. वाहतूक कोंडी मुळे स्थानिक आणि पर्यटक यांच्यात वादाची ठिणगी ही पेटत असल्याचे चित्र मालवणात आहे. किनाऱ्यावर काही अति उत्साही पर्यटकांना स्थानिक नागरिकांच्या सूचना न जुमानता समुद्रात उतरतात यावेळी समुद्री लाटांचा अंदाज न आल्याने आपत्ती स्थिती निर्माण होते. तरी पर्यटकांनी नियम वं सूचना यांचेही पालन करावे.

एकूणच मालवणचे पर्यटन यावर्षी पोषक समुद्री हवामान यामुळे पर्यटन हंगाम शेवट पर्यत अधिक बहरले आहे.

