पर्यावरण जनजागृती सायकल यात्रा २०२६ शुभारंभ
मालवण | प्रतिनिधी:
कोकणच हिरवगार सौदर्य आबाधित राखायच असेल तर पर्यावरणाचे रक्षण आपण केलेच पाहिजे. वृक्ष तोड, नदी-नाल्याचे प्रदूषण होतच राहिलो तर मानव जातीच भवितव्य धोक्यात येईल. त्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करूया. असे आवाहन राष्ट्रीय सेवादल चे नितीन वाळके यांनी केले.
राष्ट्रीय सेवा दल यांच्या वतीने पर्यावरण जनजागृती सायकल यात्रा २०२६ सागर ते सह्याद्री बीज अंकूरे अंकूरे या रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी २३ मे रोजी विजयदुर्ग येथे या रॅली चा शुभारंभ झाला. मोठ्या उत्साहात या रॅलीचे ठीकठिकाणी स्वागत करण्यात आले. आचरा बाजारपेठे येथे स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनी या सायकल रॅलीला भेट देत पर्यावरण जनजागृती बाबत कौतुक केलं. आज २४ मे रोजी मालवण रेवंडी कोळंब पंचक्रीशी यांच्या वतीने कोळंब हडकर स्टॉप येथे स्वागत करण्यात आले. स्वागत कार्यक्रमा नंतर मालवण शहरात ही सायकल रॅली पोहचली.

यावेळी कोळंब उप सरपंच विजय नेमळेकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त,
नितीन वाळके,बाळू मेस्त्री,हरिहर वाटवे,सुहास ठाकुर देसाई, नितीन तळेकर, सहदेव पाटकर, दूर्वांक मेस्त्री, रवी खोत, युगांत चव्हाण, सुदीप दिगवळेकर, तन्मय पंडित,मेधांश बांदेकर, भिवा शिरोडकर, किरण साळगावकर, ओम साळुंखे, साई साळुंखे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन वाळके म्हणाले, विजयदुर्ग येथून निघालेल्या सायकल रॅलीच्या वेळी विकासाच क्रूर रूप पहावयास मिळालं ते साऱ्यांच्या मनाला चटका लावून गेल.विजयदुर्ग ते तरळा पर्यंत मार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. यात अनेक झाडे, वटवृक्ष कापले गेले आहेत. एक वटवृक्ष जळत असताना पहिला यावेळी विकासाच क्रूर रूप मनाला चटका लावून गेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. विकास हा झाला पाहिजे मात्र विकास करताना पर्यावरणाचा विध्वंस केला जाऊ नये. आज सोपा विचार सोपा मार्ग, सोपी कार्यपद्धती जी अवलंबिली जात आहे. त्याचा विरोध खऱ्या अर्थाने केला पाहिजे. आज एवढे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मोठे- मोठे वटवृक्ष ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करून नेऊन लावू शकतात.ते तोडून किंवा जाळून टाकले पाहिजे. नष्ट केले पाहिजे अस नाही हे सर्व असताना अश्या पद्धतीने पर्यावरणाचा विध्वंस मांडला जात आहे.
खऱ्या अर्थाने आधुनिक विकासाचे भकास रूप या उन्हाळ्याच्या रूपाने,विजेच्या खेळखंडोबाच्या रूपाने, या अवकाळी पावसाच्या रूपाने साऱ्यानी पहिला. जर माणसाने सृष्टीचा विनाश थांबविला नाही तर पुढच्या ५ ते १० वर्षांमध्ये किनारपट्टी वरची गावे ही पाण्याखाली जाणार हे निश्चित आहे.जर अश्याच पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास करत राहिलो, झाडे तोडत राहिलो, नदी नाले प्रदूषित करत राहिलो,तर मानव जातीच भवितव्या धोक्यात येईल त्यासाठी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण केल पाहिजे. नवीन वृक्ष लावले पाहिजेत, हाच संदेश बीज पेरीत पेरीत जिल्हाभर सायकल रॅलीच्या माध्यमातून दिला जात आहे. असे राष्ट्रीय सेवादलचे श्री.नितिन वाळके म्हणले. मालवण शहरातील सायकल रॅली सायंकाळी कुडाळ येथे जाण्यास रवाना झाली.

