Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

गोतस्करी विरोधात मकोका कारवाईचा निर्णय जनतेच्या भावनांचा आदर : आमदार निलेश राणे

गोतस्करी विरोधात मकोका कारवाईचा निर्णय जनतेच्या भावनांचा आदर : आमदार निलेश राणे


या निर्णयामुळे गोतस्करीवर मोठा आळा बसून दोषींवर कठोर कारवाई होणार

गोहत्या, गोतस्करी रोखणे व कठोर कारवाई बाबत प्रत्येक अधिवेशनात घुमला होता आ. निलेश राणे यांचा आवाज

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आमदार निलेश राणे यांनी मानले सरकारचे आभार


मालवण : महाराष्ट्रामध्ये गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा
(MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. गोहत्या व गोतस्करी रोखण्याबाबत तसेच गोतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईबाबत सातत्याने आवाज उठवत प्रत्येक अधिवेशनात आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करणारे आमदार निलेश राणे यांनी सरकारच्या यां निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून जनतेच्या भावनांचा आदर करणार आहे. असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सरकारचे गोतस्करी विरोधी कठोर नियम : गोवंश हत्या बंदी कायदा आणि नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार प्रमुख तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई : संघटित गुन्हेगारी टोळ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता थेट 'मोक्का' अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. त्यासोबत सीमावर्ती भागात संयुक्त पथके : परराज्यातून होणारी तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर पोलीस, पशुसंवर्धन, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त तपासणी नाकेबंदी केली जाईल. तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर बंदी : स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत) आणि पोलीस यंत्रणांना विनापरवाना व अनधिकृत कत्तलखाने शोधून तातडीने बंद करण्याचे आदेश आहेत. यासह डायल ११२ हेल्पलाईन : गोतस्करी किंवा अवैध वाहतुकीची माहिती मिळताच त्वरित कारवाईसाठी 'डायल ११२' या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकारचे आभार

महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून जनतेच्या भावनांचा आदर करणारा आहे. या निर्णयामुळे गोतस्करीवर मोठा आळा बसणार असून दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. तसेच जिल्हा सीमांवर संयुक्त तपासणी नाके, अवैध गोवंश वाहतुकीवर निर्बंध, अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई, नोडल अधिकारी नियुक्त आणि 112/1962 हेल्पलाईनद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र सरकारचे आमदार निलेश राणे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

गोतस्करी विरोधात प्रत्येक अधिवेशनात घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

प्रत्येक अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी सभागृहात सातत्याने गोहत्या व गोतस्करी रोखण्याबाबत तसेच कठोर कारवाई बाबत प्रश्न उपस्थित केले. सभागृहात आणि सभागृह बाहेर सातत्याने आणि आक्रमकपणे आवाज उठवला. राज्य सरकारने गोतस्करी विरोधात MCOCA कायदा अंतर्गत कठोर कारवाईचा निर्णयc घेतला. या निर्णयात आमदार निलेश राणे यांची सातत्यपूर्ण व आक्रमक मागणी ही महत्त्वपूर्ण ठरली.


▪️अमित खोत | मालवण

rapan bottom