नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या पुढाकार
कायमस्वरूपी उपाययोजनासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपरिषद प्रयत्नशील
आमदार व प्रशासनाच्या सहकार्यातून मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यावर ही भर
नगराध्यक्षांचे नागरिक व पर्यटकांना सहकार्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : पर्यटन हंगामात मालवण शहरात, पर्यटकांची वाढती संख्या आणि वाहनांची गर्दी यांमुळे गेल्या काही दिवसांत वाहतुकीची कोंडी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर, मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर यांनी या समस्येवर तोडगा व उपयोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्नाशील आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देत चर्चा केली. पर्यटन हंगामातील वाहतूक कोंडी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने तसेच उपाययोजना दृष्टीने चर्चा करण्यात आली.
मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात
वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून नगराध्यक्षांच्या वतीने जिल्हा पोलीस निरीक्षकांना विशेष निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची सकारात्मक आणि तात्काळ दखल घेतली. शहरातील मुख्य प्रवेशद्वार आणि गर्दीचे केंद्र असलेल्या सकपाळ नाका भरड नाका व मोक्याच्या ठिकाणी आता पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांची वाढती संख्या पाहता वाहनांची गर्दी वाढतच आहे.
नगराध्यक्षांचे जनतेला आवाहन
मालवणचा विकास आणि नागरिकांना सोई सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे. आमदार निलेश राणे साहेब यांच्या गतिमान कार्यपद्धतीवर जनतेने दृढ विश्वास ठेवावा आणि मालवण शहर अधिक सुंदर व शिस्तबद्ध बनवण्यासाठी नगरपरिषदेला पूर्ण सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर यांनी केले आहे. मालवण शहराच्या प्रगतीसाठी तसेच सोई सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील आहेत. सध्य स्थितीत वाहतूक कोंडीवर उपाययोजना ही प्राथमिकता ठेवून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या सुचनेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचेही पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी व अन्य समस्या सोडवण्यात सहकार्य मिळतं आहे. नागरिक वं पर्यटक यांना अधिक सुविधा देण्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी प्रयत्नाशील असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

मालवण शहर वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी प्रयत्न....!
