Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण !

पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण !


दांडी येथील प्रकार : स्थानिक नागरिक संतप्त 

पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर स्थिती नियंत्रणात


मालवण | प्रतिनिधी :- दांडी मार्गांवर स्थानिक नागरिकांना पर्यटकांकडून शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त बनले. मारहाण करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी आक्रमकपणे करण्यात आली. काही काळ वातावरण तंग बनले होते. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी वादावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावावर नियंत्रण मिळविल्याने वातावरण शांत झाले.

दरम्यान, कडक पोलीस बंदोबस्तात पर्यटकांची गाडी आणि पर्यटकांना दांडी किनाऱ्यावरून पोलीस स्थानकात आणण्यात आले होते. सायंकाळी उशीरापर्यंत यावर चौकशी सुरू होती.


पर्यटक मिनी टॅव्हरलने मासळी खरेदीसाठी दांडी किनाऱ्यावर आले होते. जाण्याचा अरुंद मार्ग लक्षात घेता गाडी बाजूला घ्यावी व यां सांगण्याचा राग येऊन गाडीतील दोघा युवकांनी स्थानिकानवर हात उचलला होता. यावर गाडीतील इतरही पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. काही काळातच स्थानिकांनी गर्दी करत पर्यटकांना गाडीतून खाली येण्याची सूचना केली. मात्र पर्यटकांनी गाडीतच थांबून राहत वाद घालण्यास सुरूवात केली. यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले होते. पर्यटकांकडून गाडीतूनच स्थानिकांना शिवीगाळ करण्यात आल्याने अधिकच वाद वाढत गेला होता.

पोलीसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले होते.त्यांनी पर्यटकांना गाडीत थांबवून ठेवत स्थानिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्यटकांकडून देण्यात आलेली वागणून आणि करण्यात आलेल्या शिवीगाळमुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत पर्यटकांवरच कारवाई करण्याची मागणी लावून धरली. तसेच सर्वांना खाली उतरवून त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमीका घेतली.


पोलीस निरीक्षक मारूती जगताप हे घटनास्थळी पोहचल्यावर आक्रमक असलेल्या जमावाला शांत करत समजूत काढली. पर्यटकांनाही समज देत त्यांनाही पोलीस स्थानकात घेऊन गेले. दरम्यान पर्यटकांकडून स्थानिकांना झालेल्या मारहाणीचा शहरवासियांकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून पर्यटकांनी शांततेत व संयमाने आपल्या मर्यादेत राहून पर्यटनाचा आनंद लुटावा अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होती.

rapan bottom