मालवण : मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिरवंडे येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.
स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्ज्वल भालचंद्र उपरकर याने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकवला. भक्ती संतोष बेलुसे हिने ५ कि.मी. चालणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक व २०० मी. धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. दिव्या गुंडु मेस्त्री हिने थाळीफेक मध्ये द्वितीय तर गोळाफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण गोलतकर, प्राचार्य हणमंत तिवले यांनी अभिनंदन केले. यावेळी कॉलेजचे प्रा. पवन बांदेकर, प्रा. गुरूदास दळवी, प्रा. पूजा कदम आदी उपस्थित होते.

