Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

कोळंब स्मशानभूमीसाठी वाढीव निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून घ्यावा

मालवण : कोळंब स्मशानभूमीसाठी १५ लाख रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोळंब - मिर्यांबांदा गावची संयुक्त अशी स्मशानभूमी कोळंब येथे समुद्रकिनारी आहे. ही स्मशानभूमी रस्त्यापासून काहीशी खाली समुद्रालगत सखल भागात आहे. या स्मशानभूमीमध्ये गेली अनेक वर्ष तात्पुरत्या स्वरूपाची पत्राशेड घालण्यात येते. स्मशानभूमीची जागा ही सीआरझेड झोन मध्ये येत असल्याने यावर काही प्रमाणात बांधकामास बंधने येतात. त्यामुळे कमी निधी वापरून केलेले काम हे हलक्या दर्जाचे होउन खारी हवा व वारा यामुळे खराब होते.
या स्मशानभूमीसाठी विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी पाच लाखाचा निधी २०२१ मध्ये दिला व त्यानुसार कोळंब ग्रामपंचायतीच्या वतीने या स्मशानभूमी शेडचे काम करण्यात आले. परंतु खारी हवा व वेगाने वाहणारा वारा यामध्येही शेड तुटून कोसळली. सध्या या ठिकाणी शेड पूर्ववत करणे गरजेचे आहे. याठिकाणी जागेत काही प्रमाणात भराव टाकून जागेची उंची वाढवून चांगल्या दर्जाचे जाड लोखंडी खांबाचे काम अथवा आरसीसी खांब कायमस्वरूपी गरज म्हणून उभारणे गरजेचे आहे. त्यावर थोड्या उंचीवर सिमेंट स्लॅब होणे गरजेचे असून यासाठी येणारा खर्च किमान १५ ते १८ लाख रुपये इतका आहे. वाढीव निधीतून काम केल्यास ते टिकणारे आहे. अन्यथा दर चार - पाच वर्षांनी पुन्हा या साध्या हलक्या दर्जाच्या शेड कोसळून शासनाचा निधीही वाया जाणार आहे व नागरिकांना पुन्हा गैरसोय होणारी असल्याने येत्या चार ते पाच महिन्यात या स्मशानभूमीसाठी वाढीव निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून घ्यावा अथवा आम्हाला इन्स्टिमेंट काढून पत्र द्यावे. आम्ही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे शिष्टमंडळाने स्नेहा लोखंडे यांना चर्चे दरम्यान सांगितले व येणाऱ्या पुढील २०२५ या वर्षातील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ववत करावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश कोयंडे, जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, कोळंब बूथ अध्यक्ष केदार केळुसकर, श्री. शेलटकर, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ruchira top