Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुडाळ मध्ये सिंधुर्तन मधून लॉटरी पद्धतीने ताडपत्री वाटप

कुडाळ मध्ये सिंधुर्तन मधून लॉटरी पद्धतीने ताडपत्री वाटप

1379 पैकी 722 शेतकऱ्यांना मिळाला लाभ

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुरत्न समृध्द योजना सन 2024-25 अंतर्गत कुडाळ तालुक्यात 1 हजार 379 शेतकर्‍यांनी ताडपत्रीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. या सर्व शेतकरी अर्जदारांच्या लॉटरी सोडत पध्दतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामधील मंजुर 722 शेतकर्‍यांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत 657 शेतकरी ताडपत्रीच्या प्रतिक्षेत असुन शासनाकडून अनुदान उपलब्ध होताच या सर्व शेतकर्‍यांना प्राधान्याने ताडपत्री वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कुडाळ येथील तहसिल विभागाच्या समोरील कृषी कार्यालयात कुडाळ तालुका कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉटरी सोडत पध्दतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुडाळ मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे कडावल मंडळ अधिकारी रविंद्र कोळी, माणगाव मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली आदिसह कृषी सेवक, कर्मचारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यात जवळपास 13 हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाचे आहे. त्यामुळे या उन्हाळी मौसमात शेतकर्‍यांना ताडपत्रीची गरज ओळखून कृषी विभागाच्या वतीने सिंधुरत्न योजनेतून निधीची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनूसार शासनाने सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून 2 हजार रूपये ताडपत्रीसाठी निधी मंजुर केला. यामध्ये लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देवून 2 हजार रूपयाची ताडपत्री शेतकर्‍यांना केवळ 500 रूपयात उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले. त्यासाठी महिन्याभरापूर्वी शेतकर्‍यांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनानुसार कुडाळ तालुक्यातून 1 हजार 379 अर्ज दाखल झाले होते. त्या सर्व अर्जाची लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली. यामध्ये मंजुर असलेल्या 722 लाभार्थी शेतकर्‍यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. उर्वरीत 657 शेतकर्‍यांना शासनाकडून निधी उपलब्ध होताच तात्काळ ताडपत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहिले होते.

ruchira top