मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहरातील वार्ड क्र. ०६ येथे युवा सेने शाखा प्रमुख म्हणून संदीप शरद गावकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी गावकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
मालवण शहरातील संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून, आमदार वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संदीप गावकर यांनी म्हटले.
यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर, मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, अक्षय भोसले, संकेत हसोळकर, पेंडूर विभागप्रमुख शिवा भोजने आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

