सायली राणे आचरा शहर विभाग प्रमुख, भक्ती कवठकर उपतालुकाप्रमुख, रेश्मा गौडर विभागप्रमुख पदी नियुक्ती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शिवसेना शाखा कार्यालय महिला आघाडी नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका तालुका महिला आघाडी नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे यांनी दिली.
आचरा येथील सायली राणे यांना आचरा शहर विभाग प्रमुख, भक्ती कवठकर यांना उपतालुकाप्रमुख आणि रेश्मा गौडर यांना विभागप्रमुख नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, तालुका प्रमुख आशाताई वळपी, मधुरा तुळसकर, उपतालुका प्रमुख भक्ती कवठकर, प्रियांका कुमावत, शाखा प्रमुख रुपाली जुवटकर उपस्थित होते.

