जिल्हा नियोजन मधून 5 लाख मंजूर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने मानले आभार
मालवण : मसुरे तळाणीवाडी येथील स्मशानभूमीतील स्मशान शेडच्या कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे आणि शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मौजे मसुरे तळाणीवाडी येथील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांच्या प्रयत्नातून व शिवसेना शाखा प्रमुख शैलेश आंगणे आणि ग्रामपंचायत सदस्या रिया आंगणे यांच्या मागणीतून शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधुन सदर कामासाठी पाच लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांचा वतीने यावेळी त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. ग्रामस्थांना दिलेला शब्द पुर्ण करण्यात आला. असे बबन शिंदे, राजा गांवकर यांनी सांगितले.

भूमिपूजन प्रसंगी शिवसेना कुडाळ मालवण मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख राजा गावकर, तालुका संघटक प्रितम गावडे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहरप्रमुख बाळकृष्ण नाटेकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, उपतालुका संघटक प्रियांका मेस्त्री, उपतालुका संघटक प्रियांका कुमावत, उपशहर संघटक योगीता साळुंखे, अभिषेक डिचोलकर तसेच ग्रामस्थ प्रदीप आंगणे, मनीषा आंगणे, मनोहर आंगणे, आशालता आंगणे, अशोक आंगणे, विनायक आंगणे, दिपक आंगणे, सानीका आंगणे, दिपीका आंगणे, भाऊ आंगणे, भुषण आंगणे, वैशाली साळकर, नीलेश साळकर, रामदास कावले, गिता कावले, आरती चव्हाण, पौर्णिमा कांबळी उपस्थित होते.


