Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे नाट्य, कला, क्रीडा, वक्तृत्व क्षेत्रात यश

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे नाट्य, कला, क्रीडा, वक्तृत्व क्षेत्रात यश

श्रुतिका मोर्ये हिची विद्यापीठ संघात निवड

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, वक्तृत्व या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं. महाविद्यलायची प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. श्रुतिका मोर्ये हिची पखवाज वादनामध्ये मुंबई विद्यापिठाच्या संघात निवड आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मर्यादित वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या सुचिता मांजरेकर हिने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांचे आज महाविद्यालयात पुष्पगुच्च देऊन अभिनंदन करण्यात आलं.


यावेळी कामशिप्र मंडळाचे पदाधिकारी महेंद्र गवस, प्रभारी प्राचार्य अनंत लोखंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. व्ही.जी. भास्कर, प्रा. शरयू असोलकर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. प्रशांत केरवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे म्हणाले, महाविद्यालयाने यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी श्रुतिका मोर्ये हिची मृदूंग वादन विभागात युवा महोत्सवात विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. ती आता मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणार आहे. युवा महोत्सवात वाद विवाद विभागात देखील महाविद्यालयाने बक्षीस पटकावले आहे. युवा महोत्सवात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी विषयात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच चिपळूण येथे झालेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या कोकण विभाग स्तरीय फेरीत महाविद्यालयाची ऑफलाईन हि एकांकिका पहिली आली. त्यामध्ये सोहम कुडाळकर आणि सानिका कुंटे याना अभिनयासाठी पारितोषिक तर दिग्दर्शनासाठी केदार सामंत याना बक्षीस मिळाले आहे. हि एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.


मराठी विभागाची विद्यार्थिनी सुचिता मांजरेकर हिने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मर्यादीत वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. तसेच क्रीडा विभागात सुद्धा महाविद्यालयाने चांगली कामगिरी केली असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. बँडमिंटन मध्ये मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. खेड येथे झालेल्या मुलींच्या विभागीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या संघातील अक्षता राऊळ हिला उत्कृष्ट पकडचे बक्षीस मिळाले. तर पलक गावडे हिची देखील मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

ruchira top