Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दिपक केसरकर यांचे 'ते' कार्य विरोधकांनाही मान्य

दिपक केसरकर यांचे 'ते' कार्य विरोधकांनाही मान्य

निवडणूक नव्हे तर या विरोधकांनाही दीपकभाई प्रेमानेच जिंकतील : शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी

निलेश जोशी | कुडाळ : ज्या झाडाला आंबे लागतात, त्याच झाडावर दगड मारले जातात हे साऱ्यांनाच माहिती आहे. आमदार दीपक केसरकर यांना सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीची जाण आहे. सावंतवाडी मतदार संघाला स्वतःची अशी एक सांस्कृतिक ओळख आहे आणि मागील अनेक वर्षे त्या संस्कृतीला कोणाकडूनही तडा न जाऊ देण्याचे दीपक केसरकर यांचे कार्य त्यांच्या राजकीय विरोधकांनाही मनातून पटलेले आहे . विरोधकांची टीका ही केवळ राजकीय स्वार्थ आणि आपापल्या राजकीय गणितातून आहे,मनातुन नाही. राजकारण म्हणून हे चालायचेच. मात्र या विरोधकांशी योग्य वेळी चर्चा करून निवडणुकीआधीच त्यांनाही जिंकतील, असे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी म्हंटले आहे.


दीपक केसरकरांच्या कामावर ज्यांची टीका चालली आहे, ती केवळ खुर्चीच्या गणितावरची आहे. दीपक केसरकरांच्या दक्षतेमुळे काहींना आपले टक्केवारीचे भ्रष्टाचारी राजकीय गणित हवे तसे साधण्यात अडचण येते आहे हे वास्तव जनतेलाही माहित आहे. ठेकेदारांकडून टक्केवारीची लूट करण्यात ज्यांना अडसर होतो आहे, त्यांना अशा अनेक अनैतिक कारभारांसाठीच सावंतवाडी मतदारसंघ आपल्या ताब्यात हवा आहे, आणि त्यातूनच विरोधात असे लोक बदनामीची राळ उडवत आहेत त्यांना जनता यांना ओळखून आहे.

आडाळी एमआयडीसीमधुन किती नवीन उद्योग येणार आहे, त्यातून किती रोजगार निर्माण होणार आहे, दीपक केसरकरांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जात आहे, आपल्या भागातील ग्रामीण मुलांना जर्मनीसारख्या प्रगत देशात शिक्षण आणि रोजगाराची दालने कशी उघडली आहे, याबाबत शिवसेना कोणत्याही जाहीर व्यासपीठावर विरोधकांना भिडू शकते. पण ज्यांना राजकीय चिखलफेकच करायची आहे, अशा लोकांना उत्तर देत बसण्यात दीपक केसरकर सारख्या राज्यभर दबदबा असणाऱ्या नेत्याला स्वारस्य नाही.

सावंतवाडीची सुसंस्कृत जनता त्यांना जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा परस्पर उत्तर देईल. मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सावंतवाडीचा सांस्कृतिक चेहरा ओरबडण्याची विरोधकांची ही प्रवृत्ती चांगली नाही. सावंतवाडी मतदार संघाला महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्याच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची आणि महाराष्ट्राच्या पुढील भवितव्याची गरज आहे. विजय केवळ दीपक केसरकर यांचा नव्हे तर त्यांच्या रूपाने सावंतवाडी मतदार संघाच्या विकासाच्या न भूतो न भविष्यती अशा महासंकल्पाचा निश्चितपणे होणार आहे, असा दृढ विश्वास शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

ruchira top