Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ : जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून पणदूर कार्यरत असलेल्या संविता आश्रममध्ये बांधण्यात आलेल्या प्रशस्त हॉलचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता.


गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. या आश्रमासाठी नवीन इमारतीची आवश्यकता होती. आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबतची मागणी संस्थेने केल्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रशस्त हॉल बांधण्यासाठी २५ लाखाचा निधी दिला होता. वर्षभरात या निधीतून प्रशस्त असा हॉल प्रत्यक्षात उभारण्यात आला असून मंगळवारी या नूतन हॉलचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, संविता आश्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे निराधार बांधवांना सेवा देण्याचे मोठे काम होत आहे. संस्थेचे अध्यक्ष संदीप परब व त्यांची टिम यासाठी अपार मेहनत घेत आहे. निराधार बांधवांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी हा प्रशस्त हॉल बांधण्यात आला असून त्यामुळे आश्रमाची व्याप्ती आता आणखी वाढणार असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप परब म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत आणण्याचे काम आमदार वैभव नाईक करीत आहेत. संविता आश्रमासाठी त्यांचे नेहमी सहकार्य लाभते.निराधार बांधवांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रुपये निधी मंजूर करून दिला. त्यातून आश्रमासाठी प्रशस्त इमारत उभी राहिली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून सेवाभावी कार्य असेच यापुढेही चालू रहावे असे त्यांनी सांगितले.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी उप सभापती जयभारत पालव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब, साबाजी मस्के, आबा सावंत, गौरी साईल, किशोरी जाधव, धोंडी जाधव, प्रताप साईल, राकेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ruchira top