Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अन्यथा नगरपरिषद बाहेर आंदोलन….

अन्यथा नगरपरिषद बाहेर आंदोलन….

मनसे मालवण माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा इशारा

मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्यांनी चावा घेतल्याचा घटना देखील वाढल्या आहेत.भटक्या कुत्र्यांबद्दल मालवण नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तरी येत्या १०-१५ दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण मनसे च्या वतीने देण्यात आला आहे.

मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत मालवण नगरपरिषदचे दुर्लक्ष होत आहे.काही दिवसापूर्वीच मालवण मधील लहान मुलावर व त्याच्या आईवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या पायाला चावा घेऊन गंभीर दुखापत झाली आहे. हा अतिशय भीतीदायक विषय आहे. या आधीही प्रसारमाध्यमातून भटक्या कुत्र्यांचा विषय मनसे तर्फे मालवण नगरपरिषदेच्या निदर्शनास आणण्यात आला होता, परंतु त्यावर दुर्लक्ष करून कोणतीही समाधानकारक कारवाही करण्यात आली नाही.असे मनसे मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी म्हटले आहे.

तसेच गाडीसमोर कुत्रे आल्याने अपघात होण्याच्या घटना देखील वारंवार घडत आहे. तरीही प्रशासन यावर पूर्ण दुर्लक्ष करत आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळेच मालवण नगरपरिषदेने येत्या 10 ते 15 दिवसात भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त लावावा, अन्यथा मनसे तर्फे मालवण नगरपरिषदेच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मालवण माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे.

ruchira top