Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

खा. नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथे बांबू हस्तकला संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

खा. नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथे बांबू हस्तकला संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथे बांबू हस्तकला संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. देशातील हा पहिला प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असून याचा फायदा या ठिकाणच्या महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.


कुडाळ एमआयडीसी येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मंजूर झालेल्या बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, मोहन सावंत, संजय भोगटे, ॲड अमोल सामंत, शेखर सामंत, रोहित भोगटे, नायब तहसीलदार गोसावी, प्रतीक आढाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, कुडाळ उपअभियंता धीरज पिसाळ, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना शिक्षण मंत्री व सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर पुढे म्हणाले, की ही इमारत बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये बांबू संदर्भातील प्रशिक्षणे तसेच बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू असणार आहेत. बांबूपासून नवीन आर्थिक क्रांती घडू शकते. हा रोजगार प्रत्येक घरामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिला सक्षम होऊ शकतात. भारतातील हा पहिला प्रकल्प सिंधुदुर्गात होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ruchira top