Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व वैभववाडी परिसरातील विद्यार्थी यांच्यासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू होत आहे. येत्या डिसेंबर २०२४ मध्ये राज्य शासनाकडून ७००० पदांची मोठी पोलीस भरती अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग व एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. हे प्रशिक्षण १२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून तीन महिने चालणार आहे.

यामध्ये लेखी परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने तयारी करून घेतली जाईल. करियर कट्टा च्या ॲप वरती दररोज दीड ते दोन तास लेखी परीक्षेच्या तासिका होतील व पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा सर्व अभ्यासक्रम तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून घेतला जाईल. दर पंधरा दिवसातून एक सराव चाचणी महाविद्यालयामध्ये आयोजित केली जाईल. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी करून घेतली जाईल. ही चाचणी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व जुने पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातील. शारीरिक चाचणी साठी गोळा फेक व रनिंगची तयारी महाविद्यालयाच्या मैदानावर करून घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपली नावे व प्रवेश अर्ज एनसीसी विभाग प्रमुख प्रा.आर. पी. काशेट्टी (९७३०४६०८५३) व करिअर कट्टा समन्वयक डॉ.अजित दिघे (८०८७५५५४६५) यांच्याकडे द्यावीत. या प्रशिक्षणाचा महाविद्यालयातील व वैभववाडी परिसरातील पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले आहे.

rapan bottom