पालकांच्या मागणीनुसार शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गावकर, साईश घुर्ये यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : शाळांची सकाळच्या सत्रातील बदललेली वेळ पुन्हा पूर्ववत करावी. अश्या स्वरूपात पालकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता कुडाळ-मालवण शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, साईश घुर्ये यांच्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
शाळांची सकाळची वेळ त्यावेळी काही कारणांनी बदलली. मात्र बदललेल्या वेळा सोईच्या ठरण्यापेक्षा मुलांना त्रासदायक ठरत आहेत. अशी भुमिका अनेक पालकांनी व्यक्त केली. निवेदने सादर केली. यां सर्वांचा विचार करता शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, साईश घुर्ये यांच्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती राजा गांवकर यांच्या वतीने देण्यात आली.

