Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सौ. अन्वेषा अजित आचरेकर

सौ. अन्वेषा अजित आचरेकर

  • पर्यटन उद्योजिका मालवण

💐 नवदुर्गा पुष्प : चौथे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे, प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम.

कोकणच्या सागरी पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून मालवणची ओळख आहे. येथील सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक व्यावसायिक, उद्योजक यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. याच मालवणच्या पर्यटन क्षेत्रात कर्तृत्ववान महिला नेतृत्व अशी ओळख अल्पावधीत निर्माण करणाऱ्या सौ अन्वेशा अजित आचरेकर यांचा पर्यटन क्षेत्रातील प्रवास आदर्शवत असाच आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते एक पर्यटन उद्योजिका हा प्रवास मेहनत व कष्टाच्या वाटेवर राहिला. मात्र मोठ्या जिद्दीने अन्वेशा यांनी पर्यटन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

अन्वेशा या पूर्वाश्रमीच्या चारुशीला सोनवडेकर. त्यांचा जन्म देऊळवाडा येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला. शिक्षण मालवण येथेचे झाले. २०११ या वर्षी त्यांचा विवाह मालवण दांडी अजित आचरेकर यांच्याशी झाला. अजित यांचा मासेमारी हा मूळ व्यवसाय. सोबत कार टुरिस्ट व्यवसायातही अजित हे कार्यरत होते. पती अजित यांना अन्वेशा (चारुशीला) यांची खंबीर साथ लाभली. दरम्यानच्या काळात अजित हे पर्यटन व्यवसायात उतरले. अन्वेशा या पतीसोबत व्यवसायाची सतत माहिती घेत राहिल्या. या व्यवसायात काही नवीन करता येईल का ? पर्यटकांना सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्यटन सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण काहीतरी असावे या भावनेतून सतत माहिती घेणे. अन्य पर्यटन स्थळे, अन्य पर्यटन शहरे येथील सेवा सुविधा या सर्वांची माहिती घेत पती अजित यांच्या साथीने अन्वेशा यांनी पर्यटन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले.

सुरवातीला अन्य पर्यटन व्यावसायिक यांच्या सोबतीने एकत्रित व्यवसाय करून दोन वर्षी पूर्वी अन्वेशा यांनी पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग यांचे नवे युनिट उभारले. अजित स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग च्या माध्यमातून अजित, अन्वेशा यांनी सागरी पर्यटन क्षेत्रात नवी मुहूर्तमेढ रोवली.

सोबत २० ते २५ सहकारी यांच्या माध्यमातून अजित, अन्वेशा यांनी पर्यटन क्षेत्रात एक दर्जात्मक ओळख निर्माण केली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते एक उद्योजिका हा अन्वेशा यांचा प्रवास आदर्शवत असाच आहे.

अन्वेशा सांगतात आज मी जी काही आहे त्याचे सर्व श्रेय पती अजित यांचे व सर्व कुटुंबियांचे आहे. त्यांची खंबीर साथ व दिलेला विश्वास याच बळावर मी उभी आहे. पर्यटन क्षेत्रातील आमची ही सुरवात आहे. या पुढे बरेच काही नाविन्यपूर्ण करायचे आहे. पर्यटकांना दर्जेदार सेवा, सुरक्षित पर्यटन या माध्यमातून सर्वोत्तम पर्यटन सेवा देताना मालवणचा ब्रँड अधिकपणे सर्वत्र पोहचवायचा आहे. असे त्या सांगतात.

पर्यटन क्षेत्रा सोबत राजकीय क्षेत्रातही कार्यरत राहून भाजपा महिला आघाडी मालवण शहर अध्यक्षा म्ह्णून त्या ठिकाणीही आपल्या नेतृत्वाचा यशस्वी ठसा त्यांनी उमटवला. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान नेहमीच राहिले आहे. महिलांचे सक्षम नेतृत्व म्हणून त्या केंद्रस्थानी असतात. अष्टपैलू व्यक्तीमत्व अन्वेशा सामाजिक, राजकीय व पर्यटन क्षेत्रातही निश्चितच उतुंग भरारी घेतील. यात शंका नाही.स्काय न्यूज टुडे परिवाराच्या वतीने सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

rapan bottom