मालवण : मालवण शहर प्रभाग नऊ मध्ये सातेरी मंदिर व्हाळ ब्रिज येथे मनोज मोंडकर, पुनम चव्हाण यांनी स्वखर्चाने बैठक व्यवस्था साठी बॅंचेस बसवून दिले आहेत.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मोहन मराळ, युवासेनेचे उमेश चव्हाण, नागेश चव्हाण, गणेश मराळ, प्रसाद चव्हाण, संतोष मराळ, विजय यादव, विश्वास परब, बबन आचरेकर, दीपक चव्हाण, पिंटो घाडी, पांडू चव्हाण, सुहास वालावलकर, मयु मराळ, अक्षय घाडी, महिला भागिनी उपस्थित होत्या.

