मालवण : महाराष्ट्र गाेवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ॲड. संग्राम देसाई यांचे पुष्पगुच्छ तसेच शाल घालून शिवसेना युवासेनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत सोबत उद्योजक ओंकार देसाई, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवती जिल्हाप्रमुख साै. साेनाली पाटकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे, उपस्थीत होते.
यावेळी ॲड संग्राम देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे भरभरून कौतुक केलं व युवासेनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

