Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

युनोस्को टीम ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार

युनोस्को टीम ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली

मालवण | प्रतिनिधी : जागतिक वारसा म्हणून किल्ले सिंधुदुर्ग यांच्या संवर्धन व संगोपन करण्यासाठी युनोस्को टीम ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकनसाठी भारत सरकारने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील एकूण 12 किल्ल्यांची निवड केली असून सदर किल्ले मराठा मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव युनोस्कोकडे दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सांस्कृतीक मंत्रालयाचे केंद्रीय संरक्षित स्मारक असून सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला यांना वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकन मिळालेले आहे. त्या अनुषंगाने सदर दोन्ही किल्ल्यांची पाहाणी व सर्वेक्षण करण्यासाठी युनोस्को तज्ञ टीम ६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग व ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट दिली.

rapan bottom