Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी

राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी

  • पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला विश्वास
  • राज्य सरकार तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडू विशेष आभार

मालवण : राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी ठरणार आहे. असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली. किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. पर्यटंकाना सुखसुविधा निर्माण करताना आपल्या राहत्या जागेत होम स्टे, न्याहरी निवास कृषी पर्यटन प्रकल्प उभारून पर्यटन सेवा देत आहेत. परंतु अश्या प्रकल्पासाठी सरकारची कुठलीही पॉलिसी नसल्याने प्रत्येक पर्यटन व्यवसायीकांना अकृषिक कर दंडापोटी हजारो रुपये शासनाला जमा करावे लागत होते. याविषयी तारकर्ली पर्यटन विकास संस्था, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने स्थानिक प्रशासन तसेच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. यांची दखल घेऊन महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक कराविषयी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली होती. सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यावेळी तारकर्ली पर्यटन विकास संस्था व पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक करा संबधी त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. त्यांनी सदर विषय हा राज्य सरकारचा पॉलिसी मॅटर असून लवकरच मार्ग निघेल असे सांगितले होते. आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सदर कर आकारणी साठी स्थगिती चे आदेश दिले होते. नुकत्याच राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत अकृषिक कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघास दिलेल्या शब्दाची वचन पूर्ती केली आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त होम स्टे धारकांना लाभ होणार असून कोकणातील 10 हजार पेशा जास्त पर्यटन व्यवसायिकांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 121 की.मि वर राहत असलेल्या 25 हजार पेक्षा जास्त मच्छिमार कुटूंबाच्या राहत्या घरासाठी आकारण्यात आलेल्या अकृषिक करापासून कायमची मुक्तता होणार आहे. हा निर्णय कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांसाठी नवसंजिवनि देणारा ठरणार असून सामान्य नागरिकाचे 250 कोटी पेक्षा जास्त रक्कम माफ होणारी आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिंधुदुर्ग, पालघर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त करत असल्याचे विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ व महाराष्ट्र मत्स्यधोरण समिती सदस्य यांनी माहिती देताना सांगितले.

rapan bottom