Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट मत्स्य विभाग पाहणार ?

अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट मत्स्य विभाग पाहणार ?

मच्छीमार नेते रश्मीन रोगे यांचा संतप्त सवाल….

मालवण : निवती समुद्रात मच्छीमारी करून परत येत असताना दोन मच्छीमारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचे मच्छीमार म्हणून आम्हाला अतीव दुःख आहे. परंतु मत्स्य विभागाने अनधिकृत मासेमारीकडे डोळेझाक केल्यामुळे अशा घटना घडत असून. अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट मत्स्य विभाग पाहणार आहे? असा संतप्त सवाल मच्छीमार नेते रश्मीन रोगे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रश्मीन् रोगे यांनी मत्स्य उद्योग मंत्री व मत्स्य विभागाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, सिंधुदुर्गात अनधिकृत मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पर्ससीन आणि मिनी पर्ससीन मासेमारी नौका बिनदिल्लकपणे येथील समुद्रात मासेमारी करत आहेत. पारंपारिक मच्छीमारांनी नेहमीच अशा अनधिकृत मासेमारीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठविला आहे. प्रसंगी लढाही उभारला आहे. अनधिकृत मासेमारी नौका चोरी छुप्या पद्धतीने रात्री अपरात्री मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी बाहेर पडत असतात. अशा अनधिकृत मासेमारीकडे मत्स्य विभाग सोयीस्करपणे डोळेझाक करत असून या प्रकारांमुळे सर्वसामान्य मच्छीमाराचा जीव धोक्यात आला असल्याचे रश्मीन रोगे म्हणाले आहेत.

मत्स्योद्योग मंत्र्यांकडून वाटाण्याची अक्षता

मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अनधिकृत मासेमारीला आळा बसण्यासाठी सिंधुदुर्गात गस्ती नौका देणार असल्याचा शब्द दिला होता. परंतु अद्याप शासनाची कोणतीही गस्ती नौका समुद्रात दिसून आलेली नाही. सुसज्ज गस्तीनौकेची मागणी करून सुद्धा पारंपारिक मच्छीमारांच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

तर संघर्षाची वेळ आली नसती….
सिंधुदुर्गला 121 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रात त्याचप्रमाणे अनेक खाड्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते. किनारपट्टीवरील लोकांचे जीवनमान मासेमारीवर अवलंबून आहे. मच्छीमारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. असे असताना सुद्धा मत्स्योद्योग मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयातील चेंबर मध्ये बसून या खात्याचा कारभार हाकण्यात धन्यता मानली आहे. आपल्या कार्यकाळात मत्स्योद्योग मंत्री येथील किनारपट्टीवर येऊन मच्छीमारांचे प्रश्न समजून घेतले असते आणि ते सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर पारंपारिक मच्छीमारांवर संघर्षाची वेळ आली नसती.

संघर्षाला मत्स्योद्योग मंत्री आणि मत्स्य विभागच जबाबदार..

किनारपट्टीवरील संपूर्ण मच्छीमार समाज एक आहे एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाताना दिसतो. परंतु अनधिकृत मासेमारीला मत्स्य विभाग आणि मत्स्योद्योग मंत्र्यांनी अभय? दिल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाला मत्स्योद्योग मंत्री आणि मत्स्य खातेच जबाबदार असल्याचे टीका रश्मीन रोगे यांनी केली.

rapan bottom