महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग वासियांकडून होणार नागरी सत्कार
खासदार नारायण राणे व उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ॲड. संग्राम देसाई यांची निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्ग वासिय व नागरी सत्कार समिती यांच्यावतीने ॲड. संग्राम देसाई यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रविवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत, महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती नाजिक कुडाळ येथे हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
या सत्कार समारंभ सोहळ्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच कोकण पदवीधर मतदार संघ आमदार निरंजन डावखरे, कुडाळ - मालवण मतदारसंघ आमदार वैभव नाईक, कणकवली - देवगड मतदारसंघ आमदार नितेश राणे, शिक्षक मतदारसंघ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल उपाध्यक्ष अँड. सुदीप पासबोला, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य अँड. गजानन चव्हाण, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य अँड. जयंत जायभावे, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

