Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून जपण्याचा श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचा प्रयत्न : ॲड. सुहास सावंत

संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून जपण्याचा श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचा प्रयत्न : ॲड. सुहास सावंत

कै. अभय देसाई भजन स्पर्धेला सुरुवात

श्री कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे आयोजन

कुडाळ : महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठी संतांची परंपरा लाभली आहे या संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ जपत आहे. ही सर्वात मोठी कौतुकाची बाब असल्याचे ॲड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही भजन स्पर्धा सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे, हे सुद्धा अभिमानास्पद आहे असे त्यांनी सांगितले.


श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी रात्री संपन्न झाला. यावेळी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत, अमेय देसाई, विजय देसाई, माजी सरपंच अरविंद शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, नारायण राऊळ, ॲड. उमा सावंत, परीक्षक शहाबुद्दीन शेख, संजय दळवी, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ आदि उपस्थित होते.


या स्पर्धेचे यावर्षीचे ४९ वे वर्ष आहे पुढच्या वर्षी या स्पर्धेला ५० वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे. भजन स्पर्धेमध्ये एवढ्या वर्षांचे सातत्य ठेवणे कठीण आहे. पण हे मंडळ हे सातत्य राखून आहे. आणि नवीन कलाकारांना वाव मिळत आहे. भजन परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम हे मंडळ करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केले.

ruchira top