Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पर्यटन महासंघ तेव्हा गप्प का राहिला ?

पर्यटन महासंघ तेव्हा गप्प का राहिला ?

  • पर्यटन महासंघ भाजपाची बी टीम | मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांची टीका

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळ्याची जागा पर्यटकांसाठी खुली करण्यात यावी, अशी पर्यटन महासंघाची मागणी हास्यास्पद असल्याची टीका मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी केली आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यावेळी पर्यटन महासंघाने आपली याबाबतची भूमिका तटस्थपणे स्पष्ट करणे आवश्यक होते. परंतु भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या या पुतळ्याच्या कामाचे पूर्वी भाजपने श्रेय घेतले असल्याकारणाने पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मौन राहणे पसंत केले असल्याचे अन्वय प्रभू म्हणाले आहेत.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अन्वय प्रभू म्हणाले, खरं पाहता मालवण येथे भारतीय नौदलाने राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित केले, या निर्णयाचा तमाम मालवण वासियांनी व शिवप्रेमींनी स्वागत केले होते. परंतु त्यानंतर दुर्दैवाने भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी या कामाचे श्रेय घेत त्यात हस्तक्षेप केला. परिणामी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात मालवणात शिवप्रेमींमधून तीव्र पडसाद उमटले. या जनआंदोलनात मालवण मधील शिवप्रेमी सहभागी झाला होता.

पर्यटन महासंघ गप्प का राहिला ?

वस्तुतः राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी व तेथे छत्रपतींचा पुतळा उभा राहिल्यानंतर मालवणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत व त्यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा मालवणच्या पर्यटनाचा मानबिंदू बनला होता. असा पुतळा अल्पावधीतच कोसळल्यानंतर मालवणच्या पर्यटनाचे पालकत्व म्हणवून घेणाऱ्या पर्यटन महासंघा कडून प्रतिक्रियेची अपेक्षा होती. परंतु या दुर्दैवी घटनेनंतर उभ्या राहिलेल्या जन आंदोलनात पर्यटन महासंघाने शिवप्रेमींच्या बाजूने उभे राहणे आवश्यक होते. राजकीय भूमिका बाजूला ठेवून एक शिवप्रेमी म्हणून व पर्यटन व्यावसायिक म्हणून पर्यटन महासंघाच्या वतीने बाबा मोंडकर यांनी आपली प्रतिक्रिया देणे आवश्यक होते. परंतु ते या विषयात सोयीस्करपणे गप्प राहिले असल्याचे टीका अनुभव प्रभू यांनी केली.

ruchira top