Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

तीन बसेस अडकल्या

तीन बसेस अडकल्या

एसटी बस थांब्यावरून जांभवडेत आंदोलन

एसटी प्रशासनाची पोलिसात धाव

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जांभवडे हायस्कुल समोरील बस स्टॉपवर कुडाळ आगाराच्या एसटी बसेस न थांबविल्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. त्यामुळे कुडाळ आगाराच्या दोन एसटी बसेस व कणकवली आगाराची एक अशा एकुण तीन एसटी बसेस जांभवडे हायस्कुल येथे अडकुन पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थांचे हे आंदोलन सुरू राहिल्यामुळे एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
दुसरीकडे कुडाळ आगारातील अधिकार्‍यांनी कुडाळ पोलिस स्थानकावर धाव घेत आंदोलना विरोधात पोलिसांचे लक्ष वेधले.
कुडाळ तालुक्यातील जांभवडे हायस्कुल येथील शाळेत एसटीने प्रवास करणारे जवळपास 200 विद्यार्थी आहेत. या शाळेपासून बस स्टॉप दुर असल्यामुळे या शाळेजवळच एसटी बसेस थांबाव्यात अशी विनंती शाळा व्यवस्थापन व पालकांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार कणकवली व कुडाळ आगाराचे बहुतांश एसटी चालक त्या ठिकाणी एसटी बसेस थांबवून मुलांना बस मध्ये घेत होते. मात्र काही चालक जांभवडे हायस्कुल समोर गाडी न थांबविता 500 मिटर अंतरावर असलेल्या थांब्यावर एसटी थांबवू लागले. त्यामुळे बहुतांश वेळा मुले धावत एसटी पकडण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी एखाद मुलं पडुन अपघात होण्याची शक्यता असल्याने शाळा व्यवस्थापनाने कुडाळ एसटी प्रशासनाला एसटी बसेस जांभवडे हायस्कुल समोर थांबविण्याची विनंती केली. तरी देखील काही एसटी चालकांनी एसटी बसेस थांबविल्या नाहीत. त्यामुळे चार दिवसापुर्वी येथील प्रमुख मंडळी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन करत एसटी प्रशासनाच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी त्या अधिकार्‍यांनी दिलगिरी व्यक्त करत पुन्हा अशी चुक होणार नसल्याचे सांगितले होते. तरी देखील शुक्रवारी पुन्हा कुडाळ एसटी आगाराच्या चालकांनी जांभवडे हायस्कुल येथे एसटी बसेस थांबविल्या नाहीत. त्यामुळे संतप्त संस्था चालक सुभाष मडव यांच्यासह मुख्याध्यापक अनिल कातले सह पंचक्रोशीतील प्रमुख मंडळी, विद्यार्थी यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे कुडाळ- कासारखिंड, घोडगे -कुडाळ व कणकवली आगाराची घोडगे - कणकवली अशा तीन एसटी बसेस अडकुन पडल्या. आठवड्याभरात सलग दोन वेळा जांभवडेत एसटी बसेस आंदोलनामुळे खोळंबल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. याबाबत कुडाळ एसटी आगाराच्या अधिकार्‍यांनी कुडाळ पोलिस स्थानकात धाव घेत पोलिस प्रशासनासमोर आपली कैफियत मांडली.यावेळी आंदोलनास्थळी आवळेगाव पोलिस मंगेश जाधव व त्यांचे सहकारी पोहोचले होते. सायंकाळी उशिरा कुडाळ पोलिस स्थानकातून अधिक पोलिसही आंदोलन स्थळी गेल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे जांभवडेत आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच राहीले होते.

ruchira top