Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर यांचे बँक व्यवस्थापकांना निवेदन

शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर यांचे बँक व्यवस्थापकांना निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्राप्त रक्कम समायोजित करू नये | दिले निवेदन

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्राप्त रक्कम ही वेगवेगळ्या कारणांसाठी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामधून परस्पर वजा करून बँका आपली थकीत देयके महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्राप्त रक्कमेतून समायोजीत करत आहेत. अश्या प्रकारच्या तक्रारी काही महिलांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. या बाबत शिवसेना महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुरा रमेश तुळसकर यांनी युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा शाखा मालवण येथे जाऊन बँक मॅनेजर यांच्याशी याविषयावर चर्चा केली. तसेच या योजनेचा जीआर दाखऊन लाभार्थी महिलांचे पैसे रीफंड करावयाची विनंती केली. ब्रांच मॅनेजर यांनी याबाबत झालेल्या प्रोसिजर तसेच वरीष्ठांशी बोलून दोन ते तीन दिवसात पुढील कार्यवाही करू असे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासन निर्णय १९/०८/२०२४ नुसार महाराष्ट्र शासन सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्या पत्र क्र. मबावि-२०२४/प्र.क्र. ९६ (भाग-२)/का-२. नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्राप्त रक्कम ही कोणत्याही कारणासाठी समायोजीत करण्यात येऊ नये. मात्र असे असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्राप्त रक्कम ही वेगवेगळ्या कारणांसाठी समायोजित करत आहेत. यामुळे शासनाकडून लाभ मिळून ही बऱ्याच महिला लाभार्थी या लाभापासून वंचित राहिल्या असून बँकांच्या या धोरणामुळे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुळ उद्देशाला बाधा येत आहे. तरी आपण यात लक्ष घालून दि. १९/०८/२०२४ च्या महाराष्ट्र शासन सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्या पत्र क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.९६ (भाग-२)/का-२. या पत्राचा विचार करुन योग्य ती कारवाई करावी ही विनंती. असे बँक मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख प्रियांका कुमावत, उपशहरप्रमुख योगिता साळुंखे, तसेच बेसिक शिवसेना उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, सौ. तोडणकर हे उपस्थित होते.

ruchira top