Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सुधारित क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन्न

सुधारित क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन्न

क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी -जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग : निवडणूक प्रक्रियेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. निवडणुकीच्या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाचे नियोजन करुन ते काम वेळेत पूर्ण करणे करावे, केलेल्या कामांचा नियमित अहवाल देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिले.


नियोजन सभागृहात क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी श्रीमती देसाई तसेच तहसिलदार आणि क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांनी आपआपसात समन्वयाने काम करावे, प्रत्यक्ष मतदान केंद्राला भेट देऊन सर्व पाहणी करावी, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पडताळणी करावी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे, प्रत्येक काम वेळेत आणि चोख पणे पार पाडावे असेही ते म्हणाले.


श्री अग्रवाल यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे राखावी याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाच्या पूर्वी, मतदानाच्या दिवशी आणि मतदान झाल्यावर क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असते आणि ती कशा प्रकारे पार पाडायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

श्री रावले यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करावा, त्या सूचनांचे तंतोतंत पालन कशा प्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.

श्री शेवाळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्राथमिक कर्तव्ये, मतदान पूर्व जबाबदारी व कर्तव्ये, Vulnerabillty Mapping म्हणजे काय, निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात कशा प्रकारे घ्याव्यात, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी VM बाबत DEO यांना द्यावयाची माहिती, मतदान केंद्रनिहाय Vulnerabillty ठरविण्यासाठी नमुना, मतदान दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी करावयाची कामे, मतदानाच्या दिवशी करावयाची कामे आदी विषयांची माहिती प्रशिक्षणादरम्यान सविस्तर रित्या देण्यात आली.

ruchira top