युवा सेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे यांची प्रमुख उपस्थिती
सौ. सोनल मुळेकर यांची युवतीसेना उप-जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर कोतेवाडा येथील सोनल कांदळकर-मुळेकर यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
युवा सेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जनहिताच्या अनेक योजना आणल्या जात आहेत. सर्वासामन्य जनता, शेतकरी, कष्टकारी, माता-भगिनी यांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. हे सर्वासामन्य जनतेचे सरकार असून मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत असून यापुढेही होत राहतील. असे ऋत्विक सामंत यांनी या निमित्ताने सांगितले.

प्रवेशकर्त्या महिला
सौ. प्रमिला कांबळी, सौ. उत्कर्षा मंडलिक, सौ. विशाखा नाटेकर, सौ. अक्षता मसुरकर, सौ. साक्षी मुळेकर, सौ. वृषाली मोडक, वर्षा मोडक, सौ गीता मुळेकर, सौ. इशा गिरकर, कु. रेश्मा गौडर, सौ. मनीषा गौडर, माधवी मालवणकर, सौ स्वाती कुंभार, सरोज कवटणकर, सुषमा मालवणकर, सौ. स्नेहा मयेकर, दीपा मालवणकर, सुरेखा मुळेकर, उमा मालवणकर, चिगा मोडक, अंकिता पराडकर, अस्मिता पेडणेकर, मयुरी केरकर, स्मिता सारंग, सुजया कांदळकर, रश्मी केळुस्कर यांनी प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर, दाजीबा कुबल, युवासेना तालुका प्रमुख अभिषेक कांदळगावकर, ओंकार चव्हाण, तथागत मालवणकर, लौकिक मेथर, प्रतिक गावडे, शितल पेडणेकर, यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवतीसेना उप-जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
शिवसेना कुडाळ मालवण मतदारसंघाच्या युवतीसेना उप-जिल्हाप्रमुख पदी मालवण मधील सौ. सोनल कांदळकर मुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत आणि युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्या हस्ते सौ. सोनल मुळेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून व इतरांपर्यंत पोहोचवण्याबाबत काम करण्याचे आदेश या नियुक्तीपत्र द्वारे देण्यात आले आहेत.

