चौके ग्रामस्थाच्यावतीने श्री.भराडी मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त ५ ऑक्टोबर रात्रौ ९ वाजता आयोजन
चौके : चौके ग्रामस्थाच्यावतीने श्री.भराडी मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त अलिबाग रायगड जिल्हातील सुप्रसिध्द श्री. झिरेश्र्वरी प्रासादिक महिला भजन, झिरावाडा अलिबाग येथील गायिका कु.पूर्वा संदिप गावडे यांचे सुस्वर आणि सुगम संगीत भजनाचा कार्यक्रम प्रथमच मालवण तालुक्यातील चौके येथील श्री.देवी भराडी मंदिर, चौके या ठिकाणी शनिवार दिनांक ५ आॅक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी पुर्वा गावडे हिला कु. विराज म्हात्रे हे पखवाज तर कु. पार्थ गणेश म्हात्रे यांची तबला साथ लाभली आहे. अलिबाग या ठिकाणी या भजन मंडळानी बरीच भजन सादर करून भजन श्रेत्रामध्ये आपले नाव निर्माण करून सिंधुदुर्गामध्ये प्रथमच भजन सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.यानी श्री. सुनिल बुवा म्हात्रे आणि विशाल बुवा महाडीक अलिबाग यांचे ते शिष्य आहेत.भजन व्यवस्थापक म्हणून सौ.संध्या किसन गावडे आहेत.
तरी मालवण तालुक्यामध्ये प्रथमच सादर होणार्या या भजनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन चौके ग्रामस्थानी केले आहे.

